आदिवासी ठाकूर समाजसेवा मंडळ महाराष्ट्र राज्य. संघटनेने तरूण तरुणींचे आदिवासी बांधवांचे विकासचे प्रश्नन सोडविले
कर्जत/लोभेवाडी/ मोतीराम पादिर – कर्जत तालुक्यातील आदिवासी युवक व युवती शिक्षण घेवून सुशिक्षित बेरोजगार आहेत आश्या आदिवासी युवक युवंतीच्या समस्या व गरजा लक्षत घेवून आदिवासी ठाकूर समाजसेवा मंडळ महाराष्ट् राज्याच्या संघटनेच्या वतिने बेरोजगार युवक – युवंतीचे त्यांचे जिवनमान उंचवण्यासाठी त्यांच्या स्वताच्या पायावर उभे राहाण्यासाठी स्वयम रोजगारासाठी.पशुसंवर्धन. १)शेळीपाळण. २) कुकुटपाळण 3) दुग्ध व्यवसाय. हे प्रशिक्षण घेण्यासाठी युवक – युवतीने अर्ज केलेले होते.
त्यांना प्रशिक्षण मिळावे म्हणून आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य संघटनेने पुढाकर घेवून दिनांक ०२/०९/ २०२० रोजी मा. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त आलिबाग- रायगड यांच्या कडे मागणी केली होती. त्या अनुषगांने पशुसंवर्धन खात्याने १६० युवक युवतींना बॅक कर्ज मंजूरी देण्यात आली आहे. त्या विषय रविवारी दिनांक २२/११/२०२० रोजी मोरेवाडी पाथरज या ठिकाणी युवक – युवतींना माहिती व प्रमुख मार्गदर्शन करण्याताठी श्री.बाळासाहेब तिराणकर साहेब हे उपस्थित होते. युवक – युवतींना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. त्यांच्या शंकांचे पूर्णपणे निरसन केले झालेल्या लोन बदल पूर्ण माहिती देण्यात आली. या प्रशिक्षण सदर्भात अखिल युवक – युवतीच्या मनातील असलेल्या शेक्येचे समाधान केले आहे. आज नोकरी नसल्यामुळे या व्यावसायकडे वळण्याचे समाधान केले आहे व चांगले मार्गदशन सुद्धा केले. आलेल्या युवक युवतीन कडून समाधानाचे उत्तर ऐकायला मिळाले. उपस्थित आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मनोहार पादिर. कर्जत तालूका आध्यक्ष चाहू सराई. तालूका युवा अध्यक्ष प्रकाश बांगारे. सचिव धर्मा निरगुडा. सल्लागार संजय सावळा. आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटना रायगड जिल्हा उपअध्यक्ष भगवान भगत. चंद्रकांत भगत. सर. सल्लागार कुशाबा पादिर. भाऊ झुगरे. पांडूरंग पुंजारा. काळूराम वारघडे. व्होले मामा. आणि उपस्थित कार्यकर्त व युवक युवती.