जळगाव, (प्रतिनिधी) – वीर भगतसिंह विद्यार्थी परीषदे जळगाव यांचे द्वारे ऑनलाईन विद्यार्थी पदाधिकारी मेळावा घेण्यात आला.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास,वाढती बेरोजगारी आणि त्यावरील उपाय यावर कशा माध्यमाने मात केल्या जाऊ शकते व विद्यार्थी परिषदेची वाटचाल या विषयांवर सदर मेळावा घेण्यात आला.प्रदेश प्रवक्ते प्रा.पंकज रणदिवे
व विभागिय अध्यक्ष
इजि.चेतन दादा तांगडे यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केले.सदर मेळाव्याचे आयोजन जिल्हाध्यक्ष रुपेश महाजन,उपजिल्हाध्यक्ष चेतना पाटील, तसेच प्रल्हाद आर. वाघ दादा यांनी केले. तसेच महानगर अध्यक्ष दुर्गेश पाटील,बीड जिल्हाध्यक्ष योगेश्वर अंबड,गौरव पाटील,मयूर महाजन,वैभव पाटील,अक्षय शेळके,हेमंत चौधरी इ. पदाधिकारी विध्यार्थी उपस्थित होते. तसेच तुषार इंगळे यांनी ही आपले VBVP बद्दल मनोगत व्यक्त केले व पुनम मापारी, निकिता गायकवाड व इत्यादी विद्यार्थ्यांनी मीटिंग ला आवर्जून उपस्थिती लावली.