चाळीसगाव( किशोर शेवरे) – येथे नुकतीच महर्षी वाल्मिक ऋषी जयंती कोरोनामुळे अतिशय साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तुकाराम मामा कोळी यांच्या शुभहस्ते वाल्मीक ऋषींच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
त्याप्रसंगी दिलीप दादा चौधरी, रमेशभाऊ सूर्यवंशी, वनाभाऊ सोनवणे, भरतभाऊ झोडगे, राजूभाऊ सूर्यवंशी, राजूभाऊ मोरे, भाऊसाहेब सोनवणे, नितीन शिरसाट, मच्छिंद्रभाऊ चव्हाण, रवीभाऊ मोरे, कविताताई मोरे, सावळे मॅडम, आदि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते