कर्जत – कशेळे (प्रतिनीधी :-मोतीराम पादिर,दि.८/११/२०२० रोजी कर्जत तालुक्यातील कशेळे येथील भवानी माता मंदिर येथे आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्था,आदिवासी ठाकूर समाज संघटना,आदिवासी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे हे आदिवासींचे महापुरुष होते त्यांनी आपले संपूर्ण जीवन आदिवासींसाठी खर्च,आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे हे भारतीय स्वातंत्र्यलढयातील एक क्रांतीकारक सावकारशाहीस पायबंद घालून इंग्रजी सत्तेस सशस्त्र देणारे आदिवासी कोळी महादेव समाजाचे भारत देशाचे पहिले आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांची माहिती आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री.दादा पादीर यांनी आपल्या मनोगतात सांगितले.आणि आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या २१५ व्या जयंती निमित्त सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.
जयंती साजरी करण्याप्रसंगी आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दादा पादीर,उपाध्यक्ष हिंदोळा तात्या,सचिव मधुकर ढोले,आदिवासी ठाकूर समाज संघटना अध्यक्ष भरत शिद, आदिवासी ठाकूर-ठाकर नोकरवर्ग संस्था अध्यक्ष दत्तात्रय हिंदोळा,आदिवासी सेवा संघ अध्यक्ष बुधाजी हिंदोळा,पत्रकार मोतीराम पादीर,भगवान भगत,लक्ष्मण उघडे,कांता पादीर,अर्जुन केवारी,मनोहर दरवडा,वसंत ढोले,गजानन भला,बाळू ठोंबरे,गजू ठोंबरे,जगन पादीर,विजय बांगारे,नितीन निरगुडा,हरीभाऊ पारधी,तातू पादीर,राम केवारी,रवि चौधरी आदि.सह अनेक कार्यक्रते उपस्थित होते.