नाशिक – रामायनाचार्य महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र पंचवटी नाशिक येथे काळाराम मंदिर परिसरात कोळी समाजाचे आराध्यदैवत श्री महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पुतळ्याजवळ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी नाशिक पूर्व विधानसभा सदस्य आमदार मा श्री राहुलभाऊ ढिकले यांच्या हस्ते महर्षींचे षोडपचार पध्दतीने पुजन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भाऊंना समाजाचे एक निवेदन देऊन समाजाच्या वतीने भाऊंचा सत्कार करण्यात आला. नंतर सर्व संघटनाची नाशिक येथे नव्याने स्थापन केलेल्या आदिवासी कोळी समाज एकता मंच या मंचचे कार्यकारिणी सदस्य जाहीर केले होते त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत आणि हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
सर्वांच्या हस्ते प्रतिमा आणि पुतळा पुजन मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन पार केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मंचचे अध्यक्ष मा श्री संजय शिंदे सर यांनी उपस्थित सदस्यांची ओळख परिचय करून दिला. यावेळी मंचचे अध्यक्ष मा श्री संजय शिंदे , महिला आघाडीच्या अध्यक्षा मा वैशालीताई सौंदाणे, कार्याध्यक्ष मा किसनभाऊ सोनवणे, उपाध्यक्ष युवराज सैंदाणे, उपाध्यक्ष संजय गरुड, सरचिटणीस सुदाम चव्हाण, महिला उपाध्यक्ष सौ अंजलीताई अभंगराव, खजिनदार गणेश राजकोर, सचिव भगवान काकुळते, प्रसिद्ध प्रमुख श्री महेश शेवरे सर, कार्यकारिणी सदस्य नितीन शेवरे, शेखर शिरसाठ, कार्यवाहक चंद्रकांत कोळी, मा अध्यक्ष श्री संजय शिंदे सरांनी अध्यक्षीय भाषणात महर्षी वाल्मिकी ऋषी विषयी माहिती सांगून, आदिवासी कोळी समाज एकता मंच का तयार करण्यात आला हे महत्व पटवून दिले, तसेच कार्याध्यक्ष मा किसनभाऊ सोनवणे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा तयार करून आभार प्रदर्शन उपाध्यक्ष युवराज सैंदाणे आणि प्रसिध्द प्रमुख श्री महेश शेवरे सरांनी केले …….