जळगाव (प्रतिनिधी)- महानगर पालिका बरखास्तीची मागणी निव्वळ प्रसिद्धी साठी असल्याचा टोला आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना लगावला. यावेळी खासदार रक्षाताई खडसेही उपस्थित होत्या.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव महानगर पालिकेच्या अनागोंदी बाबत प्रश्न उपस्थित करून महानगर पालिका बरखास्त करण्याची मागणी केली होती त्यावर भाजपा नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर देत म्हणाले की ‘आपण’ पक्ष बदलला म्हणून महापालिकेत अनागोंदी सुरू असल्याचे कसे म्हणता येईल ? भ्रष्टाचार असेल तर तो सिध्द करा अन् मगच कारवाईची मागणी करा असे आव्हान आज आ. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिले.