जळगाव- केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी विरोधी विधेयक रद्द व्हावे,शेतकरी, शेतमजूर,हमाल,मापाडी व कामगारांना दिलासा द्यावा ही मागणी राष्ट्रपतींना करतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर स्वाक्षरी अभियान सुरू आहे.जळगाव शहरात सुरू असलेल्या स्वाक्षरी अभियानाने चांगलाच जोर पकडला आहे.आज गुरुवारी (२९ ऑक्टोबर) शहरातील समता नगर भागात घरोघरी जाऊन अभियान राबवण्यात आले.
काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकाचा निषेध म्हणून स्वाक्षरी अभियानप्रसंगी निरीक्षक प्रकाश मुगदिया,जिल्हा उपाध्यक्ष अँड. अविनाश भालेराव,विजय वाणी,विवेक ठाकरे आदी.
प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच स्वाक्षरी अभियानाचे जिल्ह्याचे निरीक्षक असलेले प्रकाश मुगदिया यांनी शहर काँग्रेसकडून प्रभागनिहाय सुरू असलेल्या अभियानाचा आढावा घेतला. जिल्हाध्यक्ष अँड. संदीप पाटील, प्रदेश सरचिटणीस आ.शिरीष चौधरी,प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील,प्रदेश सचिव डी.जी.पाटील,एनएसयुआय तसेच युवक काँग्रेसचे केंद्रीय समन्वयक योगेंद्रसिंग पाटील, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील,जिल्हा उपाध्यक्ष अँड. अविनाश भालेराव,काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय समन्वयक विनोद कोळपकर,माजी जिल्हा सरचिटणीस श्रीधर चौधरी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हितेंद्र पाटील,शहर काँग्रेसचे स्वाक्षरी मोहीम अभियानाचे कार्यक्रम प्रमुख प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनात युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल बाहेती,शहर काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शाम तायडे,नदीम काझी,विजय वाणी,विवेक ठाकरे,शहर सरचिटणीस परवेज पठाण,अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष अमजद पठाण,प्रदीप तायडे,जगदीश गाढे, ज्ञानेश्वर कोळी, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे,जाकीर बागवान आदी पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण शहरात वॉर्डनिहाय घरोघरी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधातील विधयेकाची माहिती देत ही मोहीम चालवली आहे.
दरम्यान,समता नगर भागात प्रकाश मुगदिया यांनी स्वतः भेट दिली.यावेळी विवेक ठाकरे, विजय वाणी,अँड.अविनाश भालेराव,सुमित बोदडे,भला तडवी यांच्यासह दादू कोळी विशाल महाजन,भगवान बाविस्कर हे उपस्थित होते.शत्रू राठोड,सागर भालेराव,रमजान पिंजारी,विजय पाटील, ज्ञानेश्वर गजरे,हरी जाधव,योगेश मिस्तरी, प्रवीण राखुडे,शेख जाबिर,लाखा चव्हाण, अशोक कोळी,पदमसिंग राठोड आदींनी स्वाक्षऱ्या करून विधेयकाला विरोध केला.