जळगाव- हल्ली देशात काही ठिकाणी मॉब लिंचिंगचे प्रकार उघडकीस येत असून तसाच एक प्रकार जळगांवात सुद्धा घडला परंतु पोलिसानीं त्यावर त्वरित कारवाई करून पाच आरोपींना अटक केली असली तरी येणारी बकरिद् ईद,रक्षा बंधन,१५ ऑगस्ट बघता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जमीअतचे प्रमुख मुफ्ती अतिकुररहेमान व मुफ्ती हारून नदवी यांच्या नेतृत्वाखाली जळगाव येथील एका मुस्लिम शिष्टमंडळाने पोलीस अधिक्षक डॉ पंजाबराव उगले व अप्पर जिल्हा अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची भेट घेऊन एक निवेदन दिले . त्या वेळीं जमील देशपांडे,सैयद चांद,मुश्ताक , जमील शेख, दानिश सय्यद, आरिफ देशमुख,मौलाना झाकीर,हाफिज जाहिद,शकील कुरेशी,आसिफ पटेल,अतिक शाह,अहेमद सर,आदींची उपस्थिती होती.