पाचोरा, (प्रतिनिधी) -शहरातील तमाम सर्व सार्वजनीक व घरगुती गणोशोत्सव मंडळांना पाचोरा नगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे की शासनाच्या मार्गदर्शक सुचना व म.जिल्हाधिकारी सो. जळगांव यांचेकडील आदेशानूसार दिनांक 01 सप्टेंबर 2020 रोजी होणा-या गणेश विसर्जनासाठी आपल्या मंडळाची किंवा घरगुती स्थापन करण्यात आलेल्या गणेश मुर्तींचे विसर्जन कुणीही वैयक्तीक करु नये त्यासाठी आपलेकडील गणेश मुर्ती व निर्माल्य नगरपरिषदेने ठरवून दिलेल्या विविध भागातील संकलन केंद्रावरच विसर्जनाकरीता जमा करण्याचे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी केले आहे.
गणेश मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्रे पुढील प्रमाणे…
1राजे छत्रपती संभाजी महाराज चौक
2 राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक
3.म.गांधी चौक
4.आठवडे बाजार,बाहेरपुरा
5.जळगाव चौफुली
6.जारगाव चौफुली
यावेळी गणेश विसर्जन पार्शवभूमीवर बहुळा धरणावर पाहणी करताना मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्र अधिकारी प्रकाश भोसले, कर निरीक्षक दगडू मराठे,लिपिक ललित सोनार, फायरमन राजेश कंडारे, वा चालक दत्तात्रय पाटील, मुकादम लहसे, वा चालक दीपक पाटील, वाल्मिक गायकवाड, गोपाल लोहार आदी कर्मचारी उपस्थित होते.















