जळगाव, (प्रतिनिधी)- अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या संशयास्पद आत्महत्येची निष्पक्षपणे सखोल चौकशी करण्याकरिता प्रकरण सीबीआई कडे सोपविण्यात यावे अशा मागणीचे निवेदन श्री.राजपूत करणी सेने तर्फे आज दिनांक १७ रोजी जिल्हाधिकारी,जळगाव यांना देण्यात आले.
यावेळी खान्देश अध्यक्ष प्रविणसिंग पाटील, विठ्ठलसिंग मोरे (जळगाव जिल्हा प्रमुख), आशिषसिग हाडा(जिल्हा उपाध्यक्ष), भगवानसिंग खंडाळकर(जिल्हा उपाध्यक्ष), गणेश राजपूत (जिल्हा संघटक), आदी उपस्थित होते