भुसावळ, (प्रतिनिधी)- राष्ट्रीय काँग्रेस अनु.जाती विभागाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री ना.डाँ.नितीन राऊत,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात,काँग्रेस अनु.जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे,व जळगांव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.अँड.संदिपभैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक योगेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष आदरणीय खा.राहूलजी गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त जे आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता कोरोना या संसर्गाशी लढा देऊन जनतेचे संरक्षण करीत आहेत अशा भुसावळ शहरातील कोरोना योद्धांचा गुण गौरव दि.19 रोजी काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे करण्यात आला. यात प्रामुख्याने म. पोलीस उप अधिक्षक व पोलीस कर्मचारी, सीआरपीएफ चे जवान, महसूल विभागाचे तहसिलदार ,भुसावळ नगर परिषदेचे वैद्यकीय अधिकारी,परिचारीका व सफाई कामगार तसेच मोलाचा वाटा असणारे पत्रकार बंधू या सर्वांनी गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाची भिती न बाळगता खंबीरपणे अहोरात्र लढा देत आपल्या भुसावळकरांना सुरक्षित ठेवण्याचे काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच या सर्व कोरोना योद्धांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी त्या सर्वांचा सत्कार करणं त्यांचा मान सन्मान करणं हे आपले आद्य कर्तव्य आहे, आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे असे काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष मा.विवेक नरवाडे यांनी म्हटले आहे.
यावेळी जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक योगेंद्रजी पाटील,इस्माईल गवळी,प्रविण पाटिल,दिलीप क्षिरसागर,संदिप मोरे उपस्थित होते.