विवरा ता.रावेर,(प्रतिनिधी)- तालुक्यातील विवरा बुद्रुक येथे कोरोनाची एन्ट्री झाली असून गावातील सोनार गल्ली परिसरात 53 वर्षी पुरुष रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
आढळून आलेल्या रुग्णाचा रहिवासी असलेला परिसर, दुकान परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आला आहे.
आज शुक्रवार १९ जून रोजी दुपारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवराय पाटील यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली यावेळी ग्राम विकास अधिकारी अरविंद कोलते आशा सेविका भारती जीरी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.