पुणे – आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्ताने सहजयोग ध्यान- आयुष्य घडविण्यासाठी युवकांसाठी ऑनलाईन ध्यान कार्यक्रम दि.20 जून रोजी सकाळी 10.30 वा learningsahajayoga यूट्यूब चॅनेलवर वर लाईव्ह प्रसारण करण्यात येत आहेत.
मेडिटेशन फॉर युथ, मेडिटेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन
, मेडिटेशन द्वारे आयुष्य बदललेल्या युवकांच्या प्रेरणादायी 10 जीवन कहाण्या- प्रत्यक्ष ऐका, ध्यानाचा प्रत्यक्ष अनुभव, दैनंदिन समस्यांवर मात करण्यासाठी
रजिस्टर करा – टोल फ्री क्रं 1800 30 700 800
युवकांच्या समस्या-
आजच्या युवकांसमोर स्पर्धेच्या मॉडर्न युगात संधी अनेक आणि समस्या पण अनेक अशी अवस्था आहे. शिक्षणाचे योग्य निर्णय, करियरचे निर्णय, अपेक्षित यश न मिळण्याची भीती, त्यातून निर्माण होणारे नैराश्य आणि ताण तणाव, अपेक्षांचे ओझे, नकारात्मक विचार, कामात/ अभ्यासात लक्ष न लागणे अश्या अनेक मॉडर्न समस्या दैनंदिन जीवनात आहेत.
युवक काय करू शकतो?
तुम्हाला देखील या समस्या जाणवत आहेत का? मग या समस्यांचा सामना करायला आपल्या शरीरातील सुप्त शक्ती च्या जागृतीद्वारे ध्यानाने स्वपरिवर्तनाची सुरवात करूया.
आपल्याला माहीत आहे सर्व महापुरुष आधी साधारण होते नंतर ते असामान्य आणि अद्वितीय झाले …पण केव्हा?..त्यांना आपल्या सुप्त शक्तीची जाणीव झाली तेव्हा..ते ध्यान मनन करायचे आणि समस्यांचा सामना करायचे. त्यांच्या समस्या तर अनंत पटीने कठीण होत्या. आपण ही ध्यान करू शकतो?…हो हे शक्य आहे.
युवकांसाठी ध्यान उपक्रम
श्री माताजी निर्मालादेवी यांनी सुरू केलेल्या दैनंदिन सहजयोग ध्यानाद्वारे गेल्या पन्नास वर्षांत असंख्य सर्वसामान्य युवकांनी आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून संतुलित आणि यशस्वी आयुष्य अनुभवत आहे. गरज आहे फक्त आपल्या इच्छा शक्तीची. कार्यक्रमात जाणून घ्या सहजयोग ध्यानाचे फायदे१. सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास २. सकारात्मक विचारशैली ३. ताणतणाव कमी होतो ४. आत्मविश्वास वाढतो ५. रोग प्रतिकार शक्ती वाढते ६. IQ, EQ, SQ वाढतो ७. चित्ताची एकाग्रता वाढते ८. चिडचिड कमी होते ९. अभ्यासात प्रगती होते १०. नैराश्य ( डिप्रेशन ) दूर होते.
दैनंदिन लाईव्ह ध्यान प्रशिक्षण कार्यक्रम दररोज सायं 5 वा.
YouTube चॅनेल
www.youtube.com/c/learningsahajayoga
Facebook Page –
www.facebook.com/learningsahajayoga
महाराष्ट्र सहजयोग युवाशक्तीचे 2000 स्वयंसेवक आपल्याला विनामूल्य मार्गदर्शनासाठी तत्पर आहेत. लॉकडाऊन च्या काळात असंख्य युवकांनी सहजयोग ध्यानाचा फायदा घेऊन आयुष्यातील बदलाचा अनुभव घेत आहेत. असे महाराष्ट्र सहजयोग युवाशक्ती,श्री माताजी निर्मालादेवी प्रणितस हजयोग ध्यान केंद्र,प्रतिष्ठान, पुणे यांनी कळविले आहे.