जळगाव दि १६ — काल सकाळी डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या प्रथमोपचार विभागात पावसाचे पाणी शिरले होते. हा विभाग रूग्णालय प्रशासनाच्या मार्गदर्शनाने व कर्मचा—यांच्या अथक प्रयत्नानी अवघ्या २४ तासात रूग्णसेवेत पुन्हा सूरू करण्यात आलेला आहे.
रविवार सकाळी डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या प्रथमोपचार विभागात मुसळधार पावसामूळे पाणी शिरल्याचा व्हीडीओ व्हायरल होताच काही प्रसार माध्यमांनी या प्रकरणाला चुकीची दिशा दिली तसेच काही खरी माहिती प्रदर्शित केली. ही घटना घडताच ताबडतोब संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील घटनास्थळी पोहचले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार रूग्णालयाची संपुर्ण यंत्रणा युध्दपातळीवर कामाला लागली. जेसीबी, सफाई कामगार यांच्या सहायाने अवघ्या २४ तासात हा वार्ड स्वच्छ व सॅनेटाईज करून परत सूरू करण्यात आलेला आहे. काल ज्या प्रमाणात पाणी शिरले होते त्यावरून पुढील ५ ते ७ दिवस हा विभाग बंद राहील असे चित्र असतांना प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरूड, रूग्णालय व्यवस्थापक आशिष भिरूड,बांधकाम विभागातील प्रा एन जी चौधरी, संजय भिरूड, नर्सिंगचे प्रविण कोल्हे, संकेत पाटील, शिवा बिरादार, कोमल लांडगे, आदिंच्या मार्गदर्शनानुसार डोगर सिक्युरिटी सर्विसचे सफाई कामागरांनी अवघ्या २४ तासातच हा वार्ड पुर्ववत करून रूग्णांच्या सेवेत सूरू करण्यास सहकार्य केले. माजी खा डॉ उल्हास पाटील यांनी सर्व कर्मचा—यांचे कौतुक व अभिनंदन करतांना टीम वर्क असल्याने जास्तीत जास्त चांगली सेवा आम्ही रूग्णांना देत आहोत अशी भावना व्यक्त केली.