जळगांव – सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिन (ईव्हीएम) वापरून मोठ्या प्रमाणावर फेराफेरी होत आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा आणि त्यांच्या आघाडीने ईव्हीएम मध्ये घोटाळे करून पाशवी बहुमत प्राप्त केले आहे. यामुळे मतदारांचे मताधिकाराचे मुल्य झिरो झाले असून प्रौढ मताचा अधिकार धोक्यात आल्याने संसदीय लोकशाही संकटात सापडली आहे. यासाठी ईव्हीम द्वारा होणारी निवडणूक प्रक्रिया बंद करून आगामी विधानसभा निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात तसेच मॉब लिंचिंग करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या आशयाची मागणी घेवून जळगांव जिल्हा लोकशाही बचाव संघर्ष समितीच्या वतीने आज मंगळवार,१६जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे प्रदर्शन आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलन कर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले. “ईव्हीएम हटाव,लोकशाही बचाव” “मॉब लिंचिंग करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी,” ” रामानंद नगर येथील निलेश सपकाळे या युवकास आत्महत्येस प्रवूत्त्व करणाऱ्यांना तातडीने अटक करण्यात यावी” या मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यानं सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीन मध्ये फेरफार होत असल्याने मतदारांचा मतदान प्रक्रियेवरचा विश्वास उडाला आहे.तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढारलेल्या जर्मनी, ऑस्टेलिया, अमेरिका तसेच इतर विकसित राष्ट्रांनी ईव्हीएम मशिन नाकारले असतांना भारतात ईव्हीएम द्वारा मतदान प्रक्रिया राबविण्याचा घाट हा लोकशाही संपुष्टात आणणारा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात मोजणी करतांना झालेल्या मतदानापेक्षा प्रत्येक ठिकाणी जास्त मतदान आढळून आल्याची बाब स्पष्ट झालेली आहे. ईव्हीएम वापरून घोटाळ्याची ही विसंगत कृती बंद झाली पाहिजे, मॉब लिंचिंग करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे,जळगाव शहरातील रामानंदनगर येथील रहिवाशी निलेश सपकाळे या युवकांस आत्महत्या करण्यास प्रवूत्त करणाऱ्यांना तातडीने अटक करण्यात यावी. मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्यास मतदार लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरून जनआंदोलन करतील असा ईशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
धरणे आंदोलनात लोकशाही बचाव संघर्ष समितीचे मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे, गफ्फार मलिक,भारत ससाणे,शिवराम पाटील,संजय मुरलीधर पवार,सचिन धांडे, खुशाल चव्हाण,हरिश्चंद्र सोनवणे,ईश्वर मोरे,विवेक ठाकरे,बाबुराव वाघ,पियुष नरेंद्र पाटील,अशपाक पिंजारी,प्रा.प्रितीलाल पवार,दिलीप सपकाळे,फहिम पटेल,संजय सपकाळे,गुरुनाथ सैदाणे, प्रा.डॉ.आशिष जाधव,गमीर शेख, दीपक बाविस्कर,चंदन बिर्हाडे, भारत सोनवणे, समाधान सोनवणे, नाना मगरे, माजी नगरसेवक राजू मोरे, सचिन अडकमोल, दिलीप त्र्यंबक सपकाळे,जे.डी.भालेराव, आनंदा तायडे, गौतम सपकाळे, चंद्रकांत नन्नवरे, उत्तम भालेराव, विशाल अहिरे, विश्वास बिर्हाडे, पितांबर अहिरे, रविंद्र भालेराव, विजय करंदीकर, र यशवंत घोडेस्वार, संजय बागूल, रफीक पिंजारी, डिगंबर बडगुजर,डॉ.शरीफ बागवान, अंजुम रजवी, उत्तम भालेराव यांच्यासह लोकसंग्राम मोर्चा,जनसंग्राम,बारा बलुतेदार महासंघ,शेतकरी संघटना,जळगाव जागृत मंच आदी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग होता.
यांनी व्यक्त केले विचार
धरणे प्रदर्शन आंदोलनात मुख्य सयोंजक मुकुंद सपकाळे,गफ्फार मलिक ,शिवराम पाटील,भारत ससाणे,ईश्वर मोरे,प्रा.प्रितीलाल पवार,फहिम पटेल,गुरुनाथ सैंदाणेआदींनी आपले विचार व्यक्त करून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम न वापरता बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे असे मत मांडले. भारतीय लोकशाही स्वातंत्र, समता, बंधुत्व व न्याय या तत्वावर आधारलेली असल्याने प्रत्येक भारतीय लोकशाहीत राजा झाला आहे.मात्र मॉब लिंचिंग सारख्या घटना या तत्वाच्या विरोधात असल्याने मतदानाच्या हक्कातून क्रांती करण्याची गरज आहे.परंतु ईव्हीएम मशिनद्वारे निवडणुका घेतल्या जात असल्याने त्याला विरोध करून बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणूक होण्यासाठी प्रत्येकाने आपला विरोध दर्शविला पाहिजे असा सूर यावेळी व्यक्त झाला.