लातुर, (प्रतिनिधी)- राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची ३१मे रोजी यावर्षीची 295 वी जयंती येत असुन ही जयंती आपआपल्या घरामध्येच राहुन साजरी करावी.
सध्या देशात व महाराष्ट्रात कोरोना या महाभयंकर आजाराचं संकट आलेल आहे.आपल्या राज्यावर आणि देशावर आलेल्या संकटवार मात करण्यासाठी यावर्षीची येणाऱ्या 31 मे रोजीजी राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती संपुर्ण अहिल्याप्रेमींने आपापल्या घरी राहुन घरातच साजरी करून कोरोनासारख्या महाभयंकर संकटावर मात करण्यासाठी महात्वाची भुमीका बजावुन आपले देशासाठी योगदान द्यावे. धनगर समाजातील होळकरांचा इतिहास धनगर समाजाला भविष्यासाठी मार्गदर्शन करणारा आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा राज्यकारभार हा आदर्श राज्यकारभार होता. अनेक ठिकाणी विहिरी ,तलाव निर्माण केले. भारतात महिलांची 250 वर्षांपूर्वी महिलांची फौज तयार केली.पहिला आंतरजातीय विवाह त्यांनी स्वतःहून घडून आणला.
धनगर समाजाच्या आराध्य दैवत कर्मयोगिनी राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची 295 जयंती तमाम महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी घरात राहुण अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करावी असे आव्हान मल्हार युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजीव पाटील मुकनर व जिल्हाध्यक्ष रामेश्वर नरवटे पाटील, जिल्हा सरचिटणीस नंदराज पोले पाटील,नाना नरवटे धोंडीराम पाटील गंडीपाटीकर, दीपक नरवटे, राजकुमार नरवटे, दत्ता भोरगिर, अमोल नरवटे, परशुराम सुरनर, यांनी केले आहे, घरी राहा सुरक्षित राहा आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी कोरोना या महाभयंकर संकटावर मात करण्यासाठी आपापल्या घरीच जयंती साजरी करून सहकार्य करावे.