बोदवड :- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर संचारबंदी लागू असल्यामूळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. याचा मोठा फटका ग्रामीण भागातील जनसामान्य नागरिकांना बसत आहे. रोजगाराचे दारे बंद झाल्यामूळे हातावर पोट असणार्यांची ऊपासमारी होत आहे. त्यामूळे दिव्यांग, वयोवृद्घ व निराधार गरजूंसमोर संकटाचे अरिष्ट कोसळलेले आहे. या पार्श्वभूमिवर रोजगार गमविलेल्या गरजू व निराधार कुटूबियांना मदतीचा हात म्हणून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटिल यांनी स्वखर्चाने मदत करित सुरुवातीला साधारणत: महिनाभर पुरेल ईतके जिवनावश्यक ५०० किराणा साहित्य किटचे तालूक्यातील गावांत वाटप केले होते. त्यानंतर तालुक्यातील गरजू व निराधार कुटूंबीय गावागावांतून मदत मिळवण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे धाव घेत असल्याने यानिमित्ताने किराणा साहित्य किटचे वाटप रेवती व सुरवाडा येथे करण्यात आले. यावेळी दोन्ही गावातील निराधार व गरजू कुटूंबियांची यादी गावांतील कार्यकर्त्यांकडून मागविण्यात आली होती. त्या अनूषंगाने गावातील विविध भागांत राहणाऱ्या गरजू कुटुंबियांना जिवनावश्यक किराणा साहित्य किटचे वाटप करण्यात आले.
तालूक्यातील गरजूंना युवक काँग्रेसच्या वतीने स्वखर्चातून दोन हजार किराणा साहित्य किटचे वाटप करण्याचा संकल्प केला असून निराधार गरजूंच्या नावाची यादी करण्यासाठी कार्यकर्त्यांना सुचना दिलेल्या आहेत. आतापर्यंत तालुक्यातील गरजू कुटुंबियांना ५०० किराणा साहित्य किटचे वाटप केले आहे. संघटनेच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात अडकलेल्या गोरगरीबांना मदतीचा हात देण्याच्या कामाला गती देणार असल्याचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटिल यांनी सांगितले.














