चांदवड, (प्रतिनिधी) – येथील सामाजिक कार्यकर्ते अंकुर कासलीवाल यांनी स्वखर्चाने 300 कुटुंबासाठी आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी औषधाच्या बॉटल शहर परिसरात वाटल्या. सध्याच्या कोरोना कोविड परिस्थितीत सर्वच ठिकाणी प्रेव्हेंटिव्ह डोस म्हणून आर्सेनिक 30 या औषधाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मार्केट मध्ये सध्या आर्सेनिक30 औषध चढ्या दराने विक्री सुरू असूनसुद्धा अर्निका होमिओपॅथी यांनी समाजसेवा म्हणून कमी दरात औषध उपलब्ध करून दिले. त्यानुसार अंकुर कासलीवाल, यशोदीप घमंडी,रत्नदीप बच्छाव यांनी सदर औषधांचे वाटप प्रांत कार्यालय,तहसील कार्यालय,नगरपरिषद चांदवड कार्यालय तसेच अनेक कुटुंबाना वाटप केले. अजूनही 200 कुटुंबाना उपलब्धतेनुसार औषध स्वखर्चाने वाटप करणार असल्याचे अंकुर कासलीवाल यांनी सांगितले.