भुसावळ, (प्रतिनिधी) -कर्जाचे हप्ते वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपंन्यांवर कारवाईची मागणी करिता आज 26 मे रोजी जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाच्या मार्फत , प्रांताधिकारी, भुसावळ यांना काँग्रेेस पक्षाचे जेष्ठ नेते व उत्तर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे समन्वयक योगेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील सक्तीची वसुलीसाठी त्रास देणाऱ्या फायनान्स कंपन्या व बँक तसेच अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी . रिजर्व बँकच्या आदेशाला न जुमानता येथील फायनान्स कंपन्या ग्राहकांना वारंवार फोन करून थकीत हफ्ते भरन्यासाठी फोन करून त्रास देत आहेत .सध्या रिजर्व बँकेने 1 जून ते 31 ऑगस्ट असे तीन महिने सवलत दिली असून तरी सुध्दा फायनान्स कंपन्या ग्राहक मजूदार वर्गाला त्रास देऊ नये ‘लॉकडाऊन मुळे लोकांना दोन महिन्यांपासून त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे .अश्या स्थितीत सुध्दा जे फाइनान्स कंपन्या फोन करून हफ्ते भरण्यासाठी त्रास देत असतील तर अश्या कंपन्या वर योग्य ती कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन सोशल डिस्टन्स ठेवून चर्चा करुन निवेदन देणात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष मा.विवेक नरवाडेे,योगेंद्रजी पाटील,विजय तुरकेले,मुकेश सोनवणेे उपस्थित होते.