पाचोरा, (प्रतिनिधी)- शहरातील दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात केली असून उपचार पूर्ण झाल्याने व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केल्यानंतर या दोघंही रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला.सदर रुग्णांना पुढील दोन आठवडे होम कॉरंटाईन राहण्याबाबत च्या नोटीस देखील देण्यात आल्या आहेत.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित साळुंखे डॉ. वाघ ,डॉ. गवळी, वैद्यकीय पथक उपस्थित होते. आजपर्यंत पाचोरा तालुक्यातून कोरोना संसर्ग झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकूण रुग्णांची संख्या 19 इतकी झाली असून सध्या एक रुग्ण पाचोरा येथील कोविड केयर सेंटर येथे उपचार घेत असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.
यापूर्वी पाचोरा तालुक्यातील तीन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तसेच काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालामध्ये पाचोरा तालुक्यातील 20 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक प्राप्त झालेले आहेत.यामुळे पाचोरा तालुका कोरोनामुक्ती कडे आहे.