बोदवड, (प्रतिनिधी)- तालुक्यातील ओडीए पाणी पुरवठा योजनेचा होणारा दुषीत पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आमदार चंद्रकांत पाटील यांना मिळाल्याने सारोळा फिल्टर प्लांन्टची आज पाहणी करण्यात आली.
या बाबत सविस्तर असे की, दूषित पाणी पुरवठया बाबत दिनांक १४ मे रोजी नितीन चव्हाण व ग्रामस्थांनी तक्रार करूनही शहरातील विवीध भागात दूषीत पाणी पुरवठा सुरूच होता, दिनांक १६/०५/२०ला शहरात दुषित व जंतुयुक्त पाणी पुरवठा सुरु होता त्या बाबत शांताराम कोळी यांनी बोदवड नगर पंचायतचे मख्यधिकारी श्री. भोसले यांना दुषीत पाणी पुरवठया बाबत चौकशी केली असता सदर ओडीए कडुनच दुषीत व जंतु युक्त पानी पुरवठा होत आहे असे कळवण्यात आले,ओडीएचे श्री व्ही जे पाटील यांचे कडे चौकशी केली असता त्यांच्या कडुन स्वच्छ पानी पुरवठा होत असल्याचे सांगीतले,परंतु तरीही आम्ही आमच्या सारोळा फिल्टर प्लांटची दुरस्ती करीत आहोत,मात्र दुरस्ती करूनही दुषीत पाणी पूरवठा होत असल्या मुळे त्याबाबत शांताराम कोळी यांनी आमदार चंद्रकात पाटील यांना याबाबत माहीती दिली असता व तालुक्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा विषय असल्या मुळे तात्काळ फिल्टर प्लांटला भेट देवुन संपुर्ण फिल्टर प्लांटची पाहणी केली असता सारोळा प्लांटचे बरेच साहीत्य व पाईप अती जिर्ण झालेले आहे असे निर्दषनास आणून दिले असता ,आमदार यांनी तात्काळ मुंख्यमंत्री ग्रामिण पेयजल योजनेच्या भुसावळ येथील अधीकारी यांच्याशी संपर्क करुन सारोळा फिल्टर प्लांटची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी लॉकडाऊन जरी असला तरीही पानी पुरवठा हि अत्यावश्यक सेवा असुन पुढे पावसाळा सुरवात होणार आहे पावसाळ्यात जास्त प्रमाणामध्ये नदीला गढुळ पानी असते तसेच फिल्टर प्लांट दुरुस्त नसल्यास शुध्द पाणी पुरवठा होणार नाही व तालुक्यातील नागरीकांच्या आरोग्यांला धोका होवु शकतो व त्यामुळे तुमचे सर्व कामे थांबवुन त्वरीत फिल्टर प्लांटची दुरुस्ती करण्यात यावी अशा सुचना दिल्या.