चाळीसगांव, ग्रामीण प्रतिनिधी (विकि पानकर) :- सध्या जग भरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणू पासून बचाव होण्यासाठी सरपंच अरुण एरंडे यांनी गावात उस्फूर्त उपक्रम राबविला आहे.
सविस्तर असे कि, चाळीसगांव तालुक्यात आज पर्यंत एक ही कोरोना रुग्ण नव्हता परंतु आज दि.११ मे रोजी तालुक्याच्या सीमेवर कोरोनाने शिरकाव केला आहे. ग्रामस्थांच्या सुरक्षे साठी
येथून जवळच असलेल्या खरजई येथे सरपंच, ग्रामसेवक, ग्राम पंचायत सदस्य , आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस , आशा वर्कर , व कोरोना स्वच्छता समितीच्या संगनमताने गावात प्रत्येक घरातील सदस्यांना माक्स व सेनीटायसेर वाटप करण्याचा निर्णय घेतला .
तर दि .११मे रोजी गावातील
अंगणवाडी सेविका मदतनीस , आशावर्कर व कोरोना स्वच्छता समितीच्या सदस्यांनी सेनीटायसेर व माक्स चे केले वाटप. त्या प्रसंगी सरपंच अरुण एरंडे ,आशा थोरात , रेखा गवारे , ज्योती एरंडे , हिरकनबाई पाटील , सीमा एरंडे , रत्ना चव्हाण , सुनीता गुंजाळ , कोरोना स्वच्छता समिती अध्यक्ष सुरेश बापू एरंडे , प्रदिप लक्ष्मण एरंडे, जि.प. प्राथमिक विद्यालयाच्या माजी. अध्यक्षा प्रतिभा पानकर, पत्रकार विकि पानकर व आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित. या उपक्रमाने सर्वांचे कौतुक केलं जातं आहे , तर ग्रामसेवक एस एस बिर्हाडे यांनी आव्हाहन केले आहे.