भुसावळ (प्रतिनिधी)- भारत देशातील पूरोगामी विचाराचा वारसा अविरतपणे स्वाभिमानाने लढणारे एकमेव नेतृत्व,वंचित शोषित शेतकरी शेतमजूर विचारवंत यांची बाजू परखडपणे मांडणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व तथा विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू विचाराचे व रक्ताचे वारसदार,18 पगडं जातिचं प्रेरणास्थान,बारा बलूतेदाराचं हक्काचं विचारपीठ,सामान्य कार्यकर्त्यांच बळ,वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वाभिमानी नेते आद.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त 10 मे रोजी मलकापूर येथे कोरोना च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन परिस्थितीने हतबल झालेल्या गरजू व्यक्तींना वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हानेते अतिशभाई खराटे यांच्यातर्फे जीवणावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी ता.नेते विलास तायडे,राजु इंगळे,सामाजिक कार्यकर्ते करणसिंग, संजय खराटे ‘ सचिन इंगळे ‘ किसना वानखेडे यांची उपस्थिती होती .