फैजपूर – शहरातील फैजपूर रस्त्यावरील महाविद्यालयात कोवीड केअर सेंटर मध्ये मंगळवारी अल्पोहारचे वितरण करण्यात आले. तर या ठिकाणी दररोज पिण्याच्या शुध्द पाण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहेे हा उपक्रम शहरात नगरसेवक कुंदन फेगडे मित्र मंडळा कडून राबवण्यात आला.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे कोरोना संशयित तथा क्वोरोंटाईन करण्या संर्दभातील काही रुग्ण तालुक्यात व शहरात आढळल्यास त्यांना ठेवण्यासह आरोग्य सुुविधा पुरवण्या करीता कोवीड केअर सेंटर फैजपूर रस्त्यावर असलेल्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सरू करण्यात आले आहे येथे ३० ची व्यवस्था असुन या ठिकाणी २४ तास वैद्यकिय अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेेमणुक करण्यात आली अाहे तेव्हा या ठिकाणी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या येथील वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवारी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवारा कडून अल्पोहार सह येथे कायम पिण्याच्या शुध्द पाण्याची जवाबदारी घेण्यात आली आहेे तेव्हा मंगळवारी येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. वैशाली निकुंभ, किरण जावळे, उषा बाऱ्हे, इरफान खान सह कर्मचाऱ्यांना अल्पोहार वितरण केले या प्रसंगी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, रितेश बारी, दिवाकर फेगडे, किशोर महाजन, भुषण फेगडे, मनोज बारी, दिनेश माळी सह आदींची उपस्थिती होती.