विजयी होऊन ना. महाजन मारतील विजयाचा षटकार ; कार्यकर्त्यांना ठाम विश्वास
जामनेर – जामनेर नगर पालिका ,जळगाव महापालिका आणि पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या आठही जागा निवडून आणणारे राज्याचे संकटमोचकमंत्री जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन हे १९५ पासून माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचा पराभव करून सलग पाचव्यांदा मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत . यंदा आगामी निवडणुकीतही ना. महाजन हे सलग सहाव्यांदा निवडून येतील असा ठाम विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना असून मतदार संघात तेच हुकमी एक्का ठरले असून त्यांच्याविरोधात सध्यातरी सक्षम विरोधक नसल्याने हि निवडणूक यंदा ना. महाजन यांना सोपी ठरणारी आहे. मात्र निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीला सक्षम उमेदवार उभा करावा लागणार आहे असे एकंदरीत मतदार संघाचे चित्र आहे .
१९९५ ला कार्यकर्त्यांच्या बळावर ना. गिरीश महाजन यांनी भाजपच्या तिकिटावर येत दिग्गज समजल्या जाणाऱ्या ईशवरलाल जैन यांचा पराभव केला होता . यानंतर सलग पाच पंचवार्षिक निवडणुका ना. गिरीश महाजन यांनी एकहाती जिंकल्या आहेत . १५ वर्षे विरोधात राहून त्यांनी राज्यभरात गाजलेले कापूस आंदोलन छेडले होते . त्यामुळे ते खऱ्या अर्थाने राज्यात चर्चित चेहरा म्हणून ओळखले जात होते . आता राज्यात भाजपाची सत्ता आल्याने त्यांना जलसंपदा खात्यासारखे महत्वपूर्ण खाते देण्यात आले आहे. सध्या ते जळगावचे पाल्कमंत्रीही आहेत . संकटमोचक मंत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. जटिल प्रश्नांवरही यशस्वीरीत्या तोडगा काढण्याचा त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्यावर मुख्यमंत्र्यानी लोकसभा निआवडणुकीत उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी टाकली होती ती त्यांनी यशस्वीरीत्या पेलून दाखविली आहे. आता आगामी विधानसभेची सूत्रेही त्यांच्या हाती असणार आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे . त्यांच्या जामनेर मतदार संघाचा विचार केल्यास आजमितीला कोणताही सक्षम उमेदवार विरोधकांकडे नाही . नामुष्की ओढविण्यापेकाश एखादा उमेदवार ना. महाजन यांच्या विरुद्ध उभा करण्याचा शेवटचा पर्याय विरोधकांकडे असणार आहे. मतदार संघातील जवळपास अनेक संस्था या भाजपच्या ताब्यात आहे .
अनेक दिग्गज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याने विरोधी पक्षांची स्थिती डळमळीत झाल्याचे चिट पाहायला मिळत आहे. मतदार संघ हा भगवेमय झाला आहे असेम्हटल्यास वावगे ठरू नये. आघाडीत ही जागा सध्या काँग्रेसकडे आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत रावेरची राष्ट्रवादीकडील जागा काँग्रेसला सोडण्यात आली. त्याबदल्यात जामनेर व अमळनेर विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीकडे सोडण्याचे ठरले आहे. त्यामुळे जामनेरची जागा राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे.
गिरीश महाजनांविरुद्ध हे उमेदवार असू शकतात
युतीत ही जागा भाजपकडे असून गिरीश महाजन आपले नशिब आजमावतील. राष्ट्रवादीतर्फे संजय गरूडलढण्याची शक्यता आहे. . २०१४ मध्ये काँग्रेसच्या ज्योत्स्ना विसपुते, राष्ट्रवादीच्या डी.के. पाटील यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. त्यामुळे संजय गरुड यांचा पर्याय आघाडीकडे आहे असे बोलले जात आहे.
जामनेर मतदार संघात सध्या ३ लाख ०७,३०१ इतके मतदार आहेत .
गेल्या २०१४ च्या विधानसभेत गिरीश महाजन यांना १,०३,४९८ इतकी मते मिळाली होती . तर
शिवसेनेचे सुभाष तंवर यांना १४,२३२ मते तर राष्ट्रवादीचे डी.के. पाटील यांना ६७,७३० इतकी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती
काँग्रेसच्या ज्योत्स्ना विसपुते यांना अवघी २,६९१ इतकी मते मिळाली होती.