पाचोरा ;- तालुक्यातील कर्जमाफी योजनेपासून बरेच कर्जदार सभासद वंचित आहेत अशा प्रकारच्या तक्रारी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडे आल्यात त्यावरून ८ रोजी प्रांत कार्यालयात तहसीलदार पाचोरा, सहाय्यक निबंधक, सह संस्था पाचोरा, जेडीसीसी बँकेचे अधिकारी व वि.का.सह. संस्थेचे सचिव यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत पाचोरा तालुक्यातील वि. का. सं. संस्थेचे साधारणपणे 45000 कर्जदार सभासदास असून कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ 23974 कर्जदार सभासदांनी 58 कोटी रुपये लाभ मिळाला. त्यात कर्जमाफी 11038 सभासदांना प्रोत्साहनपर कर्जमाफी 12371 सभासदांना तर O.T.S. योजनेअंतर्गत 605 सभासदांना अशा एकूण 23974 सभासदांना कर्जमाफी मिळाल्याचे सहायक निंबधक यांनी सांगितले तर उर्वरित कर्जदार सभासदांपैकी काही मयत कर्जदार सभासदांचे वारसांनी अर्ज केला नाही, प्रोत्साहन कर्जदार सभासदांनी अर्ज केला नाहीत तर बऱ्याच कर्जदार सभासदांना ऑनलाईन अर्ज भरताना त्यांचा अंगठ्याचा थम्ब येत नव्हता, तसेच ऑनलाईन अर्ज करूनही यादीत नाव समाविष्ट झाले नाही. अशा व इतर बऱ्याच तक्रारी सचिव व सहकार विभागाकडून प्राप्त झाल्यात. यावर चर्चा, विचार विनिमय करून प्रत्येक वि.का.सह सोसायटी सचिवांनी ३ दिवसाचे आत वंचित सभासदांची यादी सहाय्य्क निंबंधक कार्यालयात जमा करावी असे आदेश आमदार किशोर पाटील यांनी दिले. या याद्या प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवर मा.ना. मुख्यमंत्री व मा.ना. सहकार मंत्री यांचेकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदारांनी नमूद केले. कोणताही शेतकरी कर्जदार सभासद कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही असे धोरण शासनाचे असल्याने सचिवांनी माहिती सादर करावी असे आमदार किशोर पाटील यांनी नमूद केले.
यावेळी दिनकर देवरे यांनी कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे. व त्यामुळे नियमित कर्ज भरणारे कर्जदारदेखील कर्ज भरीत नाहीत व त्यामुळे सह. संस्था डबघाईस आल्या आहेत. याबाबत देखील मुख्यमंत्री व .ना. सहकार मंत्र्याकडे पाठपुरावा करावा व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी सभासदांची संपुर्ण कर्जमाफी मिळवून व्हावी अशी विनंती केली.
संस्थेचे सचिव यांनी १२/१३ महिन्यापासून पगार झालेले नाहीत म्हणून सोसा . कर्जखाती सचिवांच्या पगाराएवढी रक्कम जिल्हा बँककडून मिळवून द्यावी अशी विनंती सचिव संघटनेकडून करण्यात आली . यावर संस्थेचे ठराव करून जि. मध्यवर्ती बँकेकडे करावी म्हणजे पाठपुरावा करण्यात येईल. असे आश्वासन किशोर आप्पा पाटील यांनी केले.यावेळी दिनकर देवरे, उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, अंबादास सोमवंशी, स्वीय सहायक राजेश पाटील , नाना वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.