पाचोरा शहरातील सर्व वाईन शॉप सह बियर बारचे लॉकडाऊन काळातील मद्य साठे तपासणी आवश्यक!
पाचोरा,(किशोर रायसाकडा)- शहरातील सर्व वाईन शॉप सह बियर बारचे लॉकडाऊन काळातील मद्य साठे तपासणी आवश्यक असून राज्य उत्पादन विभागाने तात्काळ तपासणी सत्र राबविल्यास मद्याच्या धंद्यातील अनेक मोठे मासे गळाला लागतील अशी चर्चा शहरात होत आहे.
लॉकडाऊन काळातही शहरात अनेक ठिकाणी चढ्या दराने दारू विक्रीच्या घटना पाहायला मिळाल्या मात्र कारवाई त्या प्रमाणे होतांना दिसली नाही असे असले तरी आता सुज्ञ नागरिक शहरातील सर्वच वाईन शॉप व बियर बार यांच्या लॉकडाऊन काळातील मद्य साठे तपासले तर अनेक वाईन शॉप व बियरबार चालक दोषी आढळून येतील व नक्कीच मोठी माहिती बाहेर येईल. अशी तपासणी सत्र राज्य उत्पादन विभागाने राबविल्यास मद्याच्या धंद्यातील अनेक मोठे मासे गळाला लागतील तरी राज्य उत्पादन विभागाकडून अशा तपासणी मोहिमेची अपेक्षा पाचोरा वासियांना आहे.