- जागर प्रतिष्ठानने 75 कुटुंबांची एक आठवड्याची भूक भागविली
- अन्नधान्य मोहिमेत दिव्यांग , परित्यक्ता , हात मजूर व स्त्री निर्भर केंद्रस्थानी
भुसावळ,(प्रतिनिधी)- येथील जागर प्रतिष्ठानने लॉक डाऊन मुळे ओढवलेल्या उपासमारीवर एक पाऊल पुढे घेत जीवनावश्यक अन्नधान्य मोहीम राबविली. मोहिमेत एकूण 75 कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्य मिळाल्याने त्यांची भूक भागली.
कोरोना या जागतिक महामारीच्या संकटामुळे भारतात जीवनाश्यक अन्नधान्याचे अनेकांना प्रश्न उभे राहिले आहे. लॉक डाऊन मुळे हातावर पोट असणाऱ्यांना घराबाहेर पडता येत नाही. रोजगार, घरात येणारे उत्पन्न मध्यम पूर्णतः थांबलेला आहे. या प्रश्नांच्या सोडवणूकी करता जागर प्रतिष्ठाने एक पाऊल पुढे घेत जीवनावश्यक अन्नधान्य मोहीम भुसावळ शहर व तालुक्यातील अकलूद, वांजोळा येथे राबवली. यातील पहिल्या टप्प्यात एकूण 75 कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्य, तेल, डाळ, गहू, साबण, तांदूळ ई. वाटप करण्यात आल्याने गरजू कुटुंब सुखावली आहे. वाटपात स्त्री निर्भर, परित्यक्ता, दिव्यांग व हात मजूर कुटुंब यांना केंद्रस्थानी धरत मदत करण्यात आली. एकूण 75 कुटुंबांना एका आठवड्याचा किराना जागर प्रतिष्ठान च्या माध्यमातून गरजूंना देण्यात आला. सोशल मीडियावर केलेल्या आवाहनास दत्यांनी मदत केल्याने हा उपक्रम संपन्न झाला.
यशस्वितेसाठी प्रकल्प प्रमुख गोकुळ सोनवणे, अध्यक्ष प्रा पंकज पाटील, उपाध्यक्ष श्रीराम सपकाळे, कोषाध्यक्ष हृषिकेश पवार सचिव प्रा निलेश गुरुचल, कायदेतज्ञ हरेश पाटील, पवन पाटील, नरेंद्र पाटील यांनी व स्वयंसेवक भूषण झोपे, शैलेश महाजन, दीपक भोळे, अमोल पाटील, जितेंद्र वाघ संजय पाटील, विजय चंदेले, किरण टोकरे यांनी परिश्रम घेतले.
तर गहू, डाळ, तांदूळ व आर्थिक रूपाने दाते प्रा आर एच बारी , बापू मांडाळकर, निलेश गोरे, प्रदीप सोनवणे, विनायक देशमुख, प्रा जे डी महंत, देव सरकते, योगिता पाटील, अमित बेंडाळे, प्रमोद ननंवरे,वंदना भिरुळ, अशोक सपकाळे, समाधान जाधव यांनी योगदान दिले.