नशिराबाद, (प्रतिनिधी) – येथील ग्रामपंचायत सदस्य तथा झिअम फाँऊडेशन संस्थापक अध्यक्ष प्रदिप साळी यांनी वाढदिवस न करता गोरगरीब दिव्यांग बांधव निराधार कुटुंबाना धान्य गहू तांदूळ साखर तेल मीठ कांदा चहापावडर असा वेगळा उपक्रम राब ऊन एक नविन आदर्श निर्माण केला आहे.
याबाबत त्यांच्याशी बोलतांना म्हणाले की, वाढदिवस अत्यंत नित्य व सामान्य गोष्टी आहेत त्यात स्वत:चा आनंद साजरा करण्यापेक्षा आपला सोबत सभोवतालच्या जगातले दु;ख दुर करणे त्याच्या संकट समस्याची सोडणुक करून वंचितांच्या जिवनात हास्य फुलवणे अशा विधायक आणि सकारात्मक संकल्पपुर्तीची सुरूवात असावी म्हणून मी मागील 2019वर्षी माझा वाढदिवसाच्यानिमित्त 70 माहीला कुंटुबाना मोफत गॅस कनेशन वाटप केले होते.
सध्या सुरू असलेल्या कोरोना जीवघेण्या आजाराची साथ त्यातून निर्माण झालेले भीतीचे वातावरण सामान्य जनतेच्या दैनदिनी जीवनावर होत असलेल्या विघातक परिणाम माझ्या मनाला अत्यंत वेदना देत आहेत
आपला गावातील असंख्य कुंटुब दोन वेळेच्या अन्नासाठी संघर्ष करीत आहे
अशा काळात नशिराबाद वार्ड क्र 4 शिवसेना पार्टीचा व झिअम फाँऊडेशन यांच्या माध्यमातून आम्ही सामान्य माणसाच्या जीवनाला आधार देण्याचा आणि शेवटच्या घटकापर्यँत जाऊन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करित आहेत म्हणून यंदाच्या वर्षी वाढदिवस साजरा न करता अडी अडचणीत सापडलेल्या जनसामान्य जनतेसाठी चांगले कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
माझ्या सर्व मिञ परिवाराची मला साथ मिळाली आहे की माझा वाढदिवसाच्या जाहीरात पुष्पगुच्छ, खर्च न करता मी अन्न धान्य गहू तांदूळ साखर तेल मीठ कांदा असे वाटप केले.