Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांनी पुर्व हंगामी कापूस लागवड करु नये – कृषी विभागाचे आवाहन

najarkaid live by najarkaid live
April 24, 2020
in शेती
0
१ मे पासून होणार कपाशीच्या बियाणांची विक्री !
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 24 – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी खरीप हंगामासाठी 1 मे पासुन कापुस बियाणे उपलब्ध होणार आहे. परंतु मागील दोन वर्षाचा अनुभव पाहता शेतकऱ्यांनी पुर्व हंगामी लागवड करु नये. अन्यथा गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे.
शेतकऱ्यांना कापुस बियाणे जरी 1 मे पासुन उपलब्ध झाली तरी बागायती कापुस लागवड 1 जुन नंतरच करावी. मे महिन्याच्या मध्यावधीत तापमान 45 अंश ते 47 अंश से. पर्यंत असते, त्यामुळे जास्त तापमानात लागवड केल्यास बियाण्याची उगवण क्षमतेची टक्केवारी कमी होते. उगवले तरी नवीन अंकुर वाळुन प्रती हेक्टरी झाडांची संख्या कमी होते व मुळांची वाढ समाधानकारक होत नाही. पाने लाल होऊन झाडांची वाढ खुंटते व मर रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे उत्पन्नात घट होते. त्याचप्रमाणे लवकर लागवड केल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो. कारण मान्सुनचा चांगला पाऊस झाल्यानंतर जमिनीत सुप्ताअवस्थतेत असलेले पतंग अंडी घालतात यामुळे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो. याउलट जुन महिन्यात लागवड केलेले पिक पहिल्या पाऊस होण्याच्या वेळेस वाढीच्या अवस्थेत असल्याने व पात्या फुले नसल्याने गुलाबी बोंड अळीचे पतंगांना अंडी देण्यासाठी पिक उपलब्ध न झाल्याने ते अंडी घालु शकत नाहीत व ते नष्ट झाल्याने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होत नाही. म्हणुन जास्त तापमानाच्या विपरीत परिणाम व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन मागील दोन वर्षापासुन आपण बागायती कापसाची लागवड 1 जुन नंतर करावी अशी शिफारस करीत आहोत व त्याचे चांगले परिणाम आपल्याला मागच्या दोन हंगामामध्ये दिसुन आलेले आहेत.
तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी बियाणे, खते, पुर्व मशागत, ठिबक संचाची जोडणी इ. कामांचे चांगले नियोजन मे महिन्यात करुन 1 जुन नंतरच कापुस बियाण्यांची लागवड करावी. त्यामुळे आपला उत्पादन खर्च सुद्धा वाचेल व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होऊन चांगले उत्पन्न मिळेल.
येत्या खरीप हंगामासाठी आणि स्वत:च्या चांगल्या स्वास्थासाठी सर्व शेतकरी बांधवाना कृषी विभाग व कृषी विद्यापीठाकडुन शुभेच्छा देण्यात येत असल्याचे संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलेआहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मी कर्त्यव्यापासून परावृत्त व्हावे याकरिता हा प्रयत्न असावा – पो.नि.अरुण धनावडे

Next Post

पात्र लाभार्थ्यांसह इतर वंचितांनाही रेशनधान्य मिळावे यासाठी नगरसेविका योजना पाटील यांनी तहसीलदार  माधुरी आंधले यांना दिले निवेदन

Related Posts

जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेत जैन इरिगेशनची उत्कृष्ट कामगिरी

जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेत जैन इरिगेशनची उत्कृष्ट कामगिरी

February 26, 2025
अर्थसंकल्पात उघडणार शेतकऱ्यांसाठी ‘निधी पेटी’, जाणून घ्या सविस्तर

PM Kisan : शेतकऱ्यांनो, हे काम लवकर पूर्ण करा, नाहीतर मिळणार नाही 16 वा हप्ता

January 24, 2024
देशातील लाखो शेतकर्‍यांना अच्छे दिन येणार, सरकारचे नवीन पोर्टल सुरू

देशातील लाखो शेतकर्‍यांना अच्छे दिन येणार, सरकारचे नवीन पोर्टल सुरू

January 5, 2024

कृषी विक्रेत्यांचा भुसावळ शहर व तालुक्यात कडकडीत बंद

November 3, 2023
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय, नसेल तुम्हाला माहित तर घ्या जाणून

शेतकऱ्यांनो.. अवकाळीमुळे पिकाचं नुकसान झालंय?मग टेन्शन सोडा..असा करता येईल विम्यासाठी क्लेम??

May 2, 2023
राज्यातील शेतकऱ्यांना कृषि यंत्रसामुग्री/अवजारे खरेदीस अनुदान योजना ; त्वरित लाभ घ्या…

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अपघात सुरक्षा अनुदान योजना, संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या…

April 30, 2023
Next Post
पात्र लाभार्थ्यांसह इतर वंचितांनाही रेशनधान्य मिळावे यासाठी नगरसेविका योजना पाटील यांनी तहसीलदार  माधुरी आंधले यांना दिले निवेदन

पात्र लाभार्थ्यांसह इतर वंचितांनाही रेशनधान्य मिळावे यासाठी नगरसेविका योजना पाटील यांनी तहसीलदार  माधुरी आंधले यांना दिले निवेदन

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us