चाळीसगाव, (प्रतिनिधी) -दहिवद तालुका चाळीसगाव येथील अनेक गरजू कुटुंबांना अद्याप रेशन कार्ड नाही त्यामुळे त्यांना धान्य मिळत नाही धान्यासह अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे तत्कालीन तहसीलदार कैलास देवरे यांच्याकडेही स्वस्त धान्य दुकाना मार्फत रेशन कार्ड मागणीचे फार्म भरून दिले होते परंतु अद्याप गावातील गरजू लोकांना रेशन कार्ड मिळाले नाही कोरोणा मुळे सर्वत्र काम धंदे बंद आहे त्यामुळे दहिवद येथील रेशन कार्ड नसलेल्या अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे तरी रेशन कार्ड व स्वस्त धान्य मिळावे अशी मागणी चाळीसगाव तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनाचा विचार न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देताना शिवसेना विधान क्षेत्र प्रमुख चाळीसगाव तालुका व उपसरपंच नानासो भिमराव खलाने, उपतालुकाप्रमुख हिम्मत निकम, शेतकरी संघटनेचे युवक तालुका अध्यक्ष व व माहिती सेवाभावी संस्थेचे जिल्हा अध्यक्ष पंकज पवार, लखन मोरे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.