पाचोरा, (प्रतिनिधी)- पाचोरा नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक धनराज नारायण पाटील यांचेसह एस.टी. सावळे गौतम निकम यांचे विरोधात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून शासकीय निवास्थानात दारू पिल्याने व माक्स न लावता मुक्त संचार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे २२ एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजता पाचोरा शहरात पुजारी नगर भागात नगरपालिकेचे अधिकृत केलेले शासकीय निवासस्थान येथे फिर्यादीचे राहते घरी त्यांच्या ताब्यातील शासकीय निवासस्थानात गेले असता आरोपी क्रमांक एक धनराज नारायण पाटील नगरपरिषद पाचोरा येथे नोकरीस असलेले आरोग्य निरीक्षक व त्यांच्यासोबत असलेले आरोपी क्रमांक दोन व तीन हे गेटवरील शिपाई साक्षीदार यांच्याशी अरेरावी करून बळजबरीने फिर्यादीचे ताब्यातील शासकीय निवासस्थानात असलेल्या आवारात फिर्यादीच्या परवानगीशिवाय त्यांचे वाहनासह घुसून फिर्यादीच्या शासकीय निवासस्थानाचे पोर्चसमोर खुर्च्या टाकून दारू पीत बसले असताना फिर्यादीस पाहून वरील आरोपी क्रमांक दोन व तीन पळून गेले तसेच फिर्यादी ही घरात गेली असता फिर्यादीने आरोपी क्रमांक एक यास मागे येऊ नये असे म्हणत असताना हा फिर्यादीच्या त्यांच्या मागे जाऊन तसेच आरोपी यांनी कोणत्याही प्रकारे मास्क न लावता फिर्यादीच्या ताब्यातील शासकीय निवासस्थानात संसर्गजन्य आजार पसरण्याची इराद्याने घुसले तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांनी काढलेल्या वेगवेगळ्या आदेशांचा भंग केला म्हणून आरोपींविरोधात पाचोरा पोलीस स्टेशन रजिस्टर नंबर १७६/ २२० भादवि कलम३५४,४५२, ४४८, २७०, २६९,१८८,३४ व कलम कायदा ८५ प्रमाणे गुन्हा दाखल करून मॅजिस्ट्रेट यांच्या कडे रवाना करून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे,पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.