जळगा,(प्रतिनिधी)- शहरातील सर्व वृत्तपत्रांचे कार्यालय पोलिस स्टेशन,विविध शासकीय कार्यालय , समाजिक संस्था , प्रतिष्ठान , झोपडपट्टी भागात ८ हजार माक्सचे वाटप नाथ फाऊंडेशन चे अघ्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिनुसार माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या कडून जळगाव शहरात ८ हजार माक्स वाटप करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. दिनांक २० व २१ असे दोन जळगाव शहरात माक्सचे वाटप करण्यात आले. यावेळी नाथ फाऊंडेशन चे अघ्यक्ष अशोक लाडवंजारी , सुनिलभ माळी , दिलीप माहेश्वरी , छोटूभाऊ चौधरी , धिरज काबरा यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.