जामनेर,दि.16 (बाळू वाघ)- येथील गुरुवारचा आठवडा बाजार आज बंद असतांना देखील काही भाजीपाला व फळविक्रेत्यांनी दुकाने लावली या दुकानदारांनी कुठल्याच प्रकारचा सोशल डिस्टन्स चा नियम पाळला नाहीच तर अनेकांनी माक्स देखील न लावल्याने नगर पालिका प्रशासनाने नियमांना धाब्यावर ठेवणाऱ्या 17 भाजीपाला व फळविक्रेत्यांवर आज कारवाई केली.
सर्वत्र लॉकडाऊन असतांना जिल्हाधिकारी यांनी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश असतांना देखील काही विक्रेत्यांनी आज नियमांचे उल्लंघन केले आहे. यामुळेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील व त्यांच्या पथकाने या विक्रेत्यांचा माल जप्त करीत वजन,मापे देखील जमा करून घेतले असून दंडात्मक कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले.