बदलापूर,(प्रतिनिधी) – भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंती निमित्त घरातच अभिवादन केले.
सर्वत्र लॉकडाऊन मुळे यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती घरातच साजरी करा असे शासनाने अवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बदलापूर येथील चिमुकल्या वैदेही राहुल मेढे या पाच वर्षाच्या चिमुकलीने पांढरे शुभ्र वस्र्ह धारण करून आपल्या बाबासाहेबांना घरातच वंदन करीत अभिवादन केल्याने या चिमुकलीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.