मुंबई, (प्रतिनिधी) – बदलापूर, अंबरनाथ या शहरांतील औषधांची दुकाने वगळता अन्य जीवनावश्यक सर्व वस्तूंची दुकाने आता सकाळी १० ते दोन याच वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय पालक मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच छाया रुग्णालयात दोन रुग्णवाहिका आणि औषध तसेच अन्य वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना यावेळी दिले.
बदलापूर, अंबरनाथ या शहरांतील औषधांची दुकाने वगळता किराणा दुकान, भाजीपाला, फळे आणि दूध आदी सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी १० ते दुपारी 2 याच वेळेत सुरू ठेवण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे अवाहन देखील यावेळी पालकमंत्र्यांनी केले आहे.