Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

93 व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो

najarkaid live by najarkaid live
September 22, 2019
in राज्य
0
93 व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद – उस्मानाबाद येथील नियोजित 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. निमंत्रक संस्था असल्याने मराठवाडा साहित्य परिषदेने एकाही साहित्यिकाचे नाव सुचवले नाही. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीबाबत अखिल उस्मानाबाद येथे आज (रविवारी) पार पडलेल्या भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ या घटक संस्थांसह संलग्नित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. घटक संस्थांनी वेगवेगळ्या साहित्यिकांची नावे अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आली होती. महाराष्ट्र साहित्य परिषदने साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे नाव सुचवले होते. या नावांवर चर्चा झाल्यानंतर दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. साहित्य संमेलनाची निमंत्रक संस्था मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा असल्यामुळे ‘मसाप’ने नाव सूचवण्यात आले नाही. इतर संस्थांनी सूचवलेल्या नावांवर चर्चा झाल्यानंतर दिब्रिटो यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले, असे साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍याने सांगितले. नियोजित साहित्य संमेलन जानेवारी महिन्यात होणार आहे.
दिब्रिटो यांची कारकिर्द
फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. ‘सुवार्ता’ मासिकाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृतीपर लेखन केले आहे. ‘सुबोध बायबल – नवा करार’ या ग्रंथासाठी दिब्रिटो यांना साहित्य अकादमीचा उत्कृष्ट अनुवादासाठीचा पुरस्कार मिळाला आहे. 15 व्या मराठी ख्रिती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. ‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची’, ‘आनंदाचे अंतरंग’, ‘तेजाची पाऊले’, ‘परिवर्तनासाठी धर्म’, ‘ओअ‍ॅसिसच्या शोधात’, ‘सृजनाचा मळा’, ‘नाही मी एकला’, ‘सृजनाचा मोहोर’, ‘गोतावळा’ आदी ग्रंथ प्रकाशित आहेत. वसई येथे वास्तव्य असलेले फादर दिब्रिटो यांनी मराठी साहित्यात धर्म आणि वैचारिक लेखनाद्वारे मौलिक भर घातली आहे.
मराठीसाठी ही आश्वासक घटना: डॉ. श्रीपाद जोशी
फादर दिब्रिटो यांची आगामी संमेलनाध्यक्षपदी एकमताने झालेली निवड ही मराठी साहित्य संस्थात्मक व्यवहार आणि एकूणच मराठीसाठी फार आश्वासक घटना आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कवी आणि समिक्षक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केली आहे. फादर दिब्रिटो यांच्यासह हा निर्णय घेणारे महामंडळाचे सर्व पदाधिकारी , सदस्य आणि या निर्णयात सहभागी सर्व घटक ,समाविष्ट व संलग्न संस्था या सार्‍यांचेही या ऐतिहासिक स्वरूपाच्या निर्णयाबद्दल त्यांनी मन: पूर्वक अभिनंदन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुण्यात आघाडीचं ठरलं! राष्ट्रवादी 4, काँग्रेस 3 जागांवर लढणार

Next Post

अल कायदा’च्या दहशतवाद्याला अटक

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
अल कायदा’च्या दहशतवाद्याला अटक

अल कायदा’च्या दहशतवाद्याला अटक

ताज्या बातम्या

Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात 'या' कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात ‘या’ कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

March 16, 2026
Bank Holiday March 2026 : पुढील आठवड्यात सलग सुट्ट्या; 'या' तारखांना बँका बंद 

Bank Holiday March 2026 : पुढील आठवड्यात सलग सुट्ट्या; ‘या’ तारखांना बँका बंद 

March 16, 2026
Jalgaon Crime News : शीतपेयातून गुंगीचे औषध देत अत्याचार

Jalgaon Crime News : शीतपेयातून गुंगीचे औषध देत अत्याचार

March 16, 2026
कीर्तनकाराचा विकृत चेहरा उघड! अल्पवयीन मुलीला चटके देत अत्याचार; महाराष्ट्र हादरला!

कीर्तनकाराचा विकृत चेहरा उघड! अल्पवयीन मुलीला चटके देत अत्याचार; महाराष्ट्र हादरला!

March 16, 2026
1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

March 15, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us