पाचोरा, (किशोर रायसाकडा)- तालुक्यातील वरखेडी येथील मराठी शाळेजवळ दररोज गावठीदारुची खुलेआम विक्री होत आहे या ठिकाणी दारु मिळवण्यासाठी दारुड्यांची एकच झुंबड उडते व दारू विक्रेते स्थानिक लोकांना दाद देत नाहीत व दादागिरी करतात तर कुऱ्हाड , शिंदाड , सार्वे पिंप्री , पिंपळगाव हरेश्वर , सातगाव डोंगरी , लोहारा , कळमसरा या गावातही दारू विक्री सुरू आहे तसेच शिंदाड येथून जवळच असलेल्या गव्हले शिवारात जुगाराचा मोठा अड्डा सुरू असून या ठिकाणी दरतासाला लाखो रुपयांची उलाढाल होत असून याच ठिकाणी काही सावकार सोने , मोटारसायकल व मीळेल त्या किंमती वस्तू गहाण ठेवून शेकडा दहा ते पंधरा रुपये दरदिवशी व्याज कमावत आहे.
या बाबतीत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार व फोन करुनही फायदा होत नाही.उलट तक्रारदार व फोन करणाऱ्या इसमाचे नाव गुप्त न ठेवता अवैधधंद्ये करणारांना सांगितले जातात.
या प्रकारामुळे गावागावात भांडणे होत असून सभ्य लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे,गेल्या काहि दिवसात डि वाय एस पी ईश्वरजी कातकाडे यांनी आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन पिपंळगाव येथील पत्याचा क्लब उध्वस्त केला होता,त्या सुरू असलेल्या क्लबची माहिती पिपंळगाव येथील स्थानिक अधिकारी यांना नव्हती का? असाही सवाल आता ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे,
तरी वरीष्ठ अधिकारी यांनी दखल घेवून अवैधधंद्ये बंद करून लॉगडाऊनचा फज्जा उडवणारावर कडक कारवाई करावी असे परिसरातील नागरिक मागणी करत आहेत,