पाचोरा नगरपरिषदेतर्फे दिनांक 10/04/2020 रोजी छत्रपती शिवाजी चौकापासून हायड्रोपावर प्रेशर स्प्रेअर मशिनद्वारे सोडियम हायपोक्लोराईड (अँन्टी व्हायरस) ची फवारणी करुन शहरातील मुख्य रस्ते व रस्त्याच्या कडेचा भाग निर्जंतूक करण्यात आला. त्याचप्रमाणे शहराच्या लहान गल्लीबोळात फोगिंग व स्प्रे पंप व्दारे फवारणी सुरु करण्यात आलेली आहे. सदरची मोहीम ही दिनांक 10/04/2020 रोजी सकाळी 8-00 वाजेपासून रेल्वे ट्रॅकच्या पुर्वेकडील व हिवरा नदिच्या पश्चिमेकडील प्रभाग क्रं. 2, 4, 5, 6, 10 व 11 या भागात दिनांक 11/04/2020 रोजी सकाळी 8-00 वाजेपासून कृष्णापुरीच्या पुर्वेकडील प्रभाग क्रं. 3, 12 व 13 या भागात त्याच प्रमाणे दिनांक 12/04/2020 रोजी सकाळी 8-00 वाजेपासून रेल्वे ट्रॅकच्या पश्चिमेकडील प्रभाग क्रं.1, 7, 8 व 9 या प्रभागात फवारणी केली जाणार आहे. या व्यतिरीक्त विविध शासकिय कार्यालये, बॅक परिसर, दवाखाने आदी ठिकाणी फवारणी करण्यात येत आहे. शहरात फवारणी सुरु असल्या कारणाने कोणीही फवारणी यंत्रांच्या आजूबाजूस उभे राहू नये, आपआपली दारे बंद करुन घ्यावीत, घराबाहेर खाद्य पदार्थ, पिण्याचे पाणी ठेवू नये, लहान मुलांना घराबाहेर पडू देवू नये कारण फवारणी करण्यात येणारी औषधे विषारी व शरीराला अपायकारक आहे. त्यामुळे सदर औषधाच्या संपर्कात येवू नये असे आवाहन मुख्याधिकारी श्रीमती.शोभा बाविस्कर यांनी केले आहे.
या वेळी सफाई कर्मचा-यांना मास्क, सॅनीटायझर व ग्लोज वाटप करण्यात आले वेळी नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, प्रशाकिय अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्य निरिक्षक धनराज पाटील, माजी नगरसेवक गणेश पाटील, भांडार विभागाचे ललित सोनार, राजेंद्र शिंपी, शाम ढवळे, गोपाल लोहार, किशोर मराठे, राजेश कंडारे, भागवत पाटील पप्पू राजपूत, भिकन गायकवाड, आकाश खैरनार, फवारणी कर्मचारी अनिल पारोचे, डिगंबर लक्ष्मण पाटील, भगवान पाटील, विजय जगताप, किसन आदिवाल, सागर मोरे, गणेश अहिरे, बापूराव जाधव यांचा समावेश होता. नगरपरिषदेचे फवारणी ट्रॅक्टर देखिल गटारी व पाण्याच्या साचलेल्या डबक्यात जंतूनाशके फवारणी करीत आहे. त्यामध्ये मॅलीथिओन व पायरेथ्रमचा वापर केला जात आहे.