जळगांव(प्रतिनिधी)जळगांव शहरातील सिरसोली रोड वरील व मोहाडी परिसरातील झोपडपट्टी भागात स्वप्नसाकार फौंडेशन व मौलाना आझाद फौंडेशनच्या वतीने गरजू कुटूंबाना जेवण व मास्क वाटप करण्यात आहे. भारती काळे यांनी कोरोना व्हायरस बाबत महिलांना मार्गदर्शन करून अश्या परिस्थितीत सर्वांनी काळजी घ्यावी व मास्कचा वापर करावा,वारंवार हात स्वच्छ साबणाने धुवावे, घरच्या बाहेर जाऊ नये या बाबत महिलांना मार्गदर्शन केले.
महिलांना जेवण सोबत १०० मास्क वाटप करण्यात आले.
या वेळी स्वप्नसाकार फाऊंडेशनचे अध्यक्षा भारती काळे, मौलाना आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, राकेश कंडारे,प्रा. नारायण पवार,चेतन निंबोळकर,सुनील गजभिये, जुबेर भाई आदीं उपस्थित होते.