जळगाव,(प्रतिनिधी)शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संशयित म्हणून दाखल असलेल्या दोन रूग्णांचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला होता.या संशयितांच्या तपासणीचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. या दोघांसह इतर 14 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
या दोघांच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. यंत्रणा देखील अलर्ट झाली होती. मात्र त्या दोघांचेही तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासादायक वृत्त जळगाव वासियांना मिळाले असला तरी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.