जळगाव, (प्रतिनिधी) – शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिल्ली येथून आलेल्या एका व्यक्तीला एमआयडीसी पोलिसांनी आज दि. 5 रोजी ताब्यात घेऊन कोरोना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत सविस्तर असे की, पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या सूचनेनुसार पोलीस कॉन्स्टेबल गोविंदा पाटील व असीम तडवी यांनी दिल्ली येथून परतलेल्या व्यक्तीचा शोध घेतला. तो दिल्ली येथे धार्मिक स्थळावर गेला होता. 14 रोजी तेथून परत आला होता. तेव्हापासुन तो स्वत: बाबतची माहिती लपवुन वास्तव्यास होता अशी माहिती मिळाल्याने पोलिसांनी शोध घेत त्या व्यक्तीस ताब्यत घेत पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले आहे.