जळगाव,(प्रतिनिधी) – कोरोना विषाणू बाधित व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता व जिल्ह्यातील सामान्य रुग्णांच्या उपचारासाठी आज दि. 4 रोजी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी गोदावरी फाउंडेशन संचालित डाॅ उल्हास पाटील मेडिकल व जनरल हाॅस्पिटल अधिग्रहीतकरण्याचा निर्णय घेतला.
सामान्य रुग्णांच्या उपचारासाठी उपाय योजना राबविण्यासाठी गोदावरी फाउंडेशन संचालित डाॅ उल्हास पाटील मेडिकल व जनरल हाॅस्पिटल अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.