जळगाव, (प्रतिनिधी)- शहरातील खान्देश सेंट्रल मॉलच्या वतीने शहर पोलीस स्टेशन व इतर पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच सफाई कामगार यांना दि.4 एप्रिल रोजी माक्स व सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समाजातील सर्वच स्तरातून प्रयत्न होत असतांना खान्देश सेंट्रल मॉलच्या वतीने पुढे येत आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले. यावेळी व्यवस्थापक अमित भट्ट, कर्मचारी शेख इस्माईल, एम.जी.पाटील, निलेश किरंगे, प्रशांत नेवे आदीनी साहित्य वितरण केले आहे