जळगाव (प्रतिनिधी) दि. 26 – महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई यांचेकडील 14 मार्च, 2020 रोजीच्या पत्रानुसार कोरोना विषाणू (कोव्हिड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 हा 13 मार्च पासून लागु करून खंड 2 ते 4 मधील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचित निर्गमित करणेत आलेली आहे. तसेच प्रतिबंधात्मक योजनांचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांच्या 21 मार्च 2020 च्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी व तत्सम प्रकारचे दुकाने हे 23 मार्चपासून पुढील आदेशांपर्यंत पुर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत.
जळगाव शहरात नोकरी, व्यवसाय व शिक्षणाकरीता एकटे राहणाऱ्या व्यक्ती व इतरांची फुड पार्सलची निकड लक्षात घेता शहरातील एकूण 8 हॉटेल/रेस्टॉरंट यांना पार्सल काऊंटरची अनुमती देण्यात आलेली आहे. त्या हॉटेल्स/रेस्टॉरंटची नावे संपर्क क्रमांक व त्यांचा पत्ता पुढीलप्रमाणे-
हॉटेल सिल्वर पॅलेस-0257-2232888 स्टेशन रोड, जळगाव, हॉटेल मुरली मनोहर-0257-2234697 आकाशवाणी चौक, जळगाव, हॉटेल शालीमार-0257-2233627 भास्कर मार्केट, जळगाव, हॉटेल मुरली मनोहर-0257-224678 अजिंठा चौफुली, जळगाव, हॉटेल उत्तम भोज-0257-2229701 चित्रा चौक, जळगाव, हॉटेल गौरव-9823248333 खेडी रोड, जळगाव, हॉटेल जलसा- 9822195556 बहिणाबाई उद्यान, जळगाव, हॉटेल रसिका-9420348757 मानसिंग मार्केट, जळगाव या 8 हॉटेल्स/रेस्टॉरंट यांनाच फुड पार्सलची परवानगी देण्यात आलेली आहे, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. असे अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव वामन कदम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.