पाचोरा- येथील मधुराज डिजिटल व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना उपक्रमांतर्गत जनजागरण बॅनरचे अनावरण शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले . याप्रसंगी उपस्थितांना सेनीटायझर व टिशू पेपरचे वाटप करण्यात आले . गिरड रोड चौफुली वरील सांडू भावराव व्यापारी संकुलातील मधुराज डिजिटल समोर कोरोना जनजागरण डिजिटल बॅनर लावण्यात आले असून त्यावर कोरोना विषाणूची लागण रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत उपयुक्त टिप्स देण्यात आल्या आहेत . या परिसरात येणाऱ्या नागरिकांचे त्यामुळे प्रबोधन होणार आहे .यावेळी उपस्थितांना हाताला लावण्यासाठी सेनीटायझर व टिश्यु पेपरही देण्यात आला.
याप्रसंगी मधुराज डिजिटल चे सुनील सोनार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, प्रा सी एन चौधरी, प्रमोद सोनवणे ,मिलिंद सोनवणे, शांताराम चौधरी, अनिल येवले, निलेश पाटील, महेंद्र अग्रवाल ,महेश कौंडीण्य यांचेसह परिसरातील दुकानदार उपस्थित होते .सुनील सोनार यांनी या उपक्रमा संदर्भात माहिती दिली किशोर रायसाकडा यांनी आभार मानले .