रायसोनी महाविध्यालयात पालक मेळाव्याप्रसंगी डॉ. प्रा. प्रिती अग्रवाल यांचे मत
जळगाव – मुलांना त्यांच्या आवडीने अभ्यास करू द्यावे. शिक्षक-पालक यांच्यात समन्वय साधून विद्यार्थ्यांनी अभ्यास केल्यास निश्चितपणे यश मिळते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी जे चांगले आहे ते अगोदर शोधले पाहिजे असे आवाहन रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. प्रा. प्रिती अग्रवाल यांनी केले. जी. एच. रायसोनी महाविध्यालयाच्या बीबीए प्रथम वर्षाच्या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. प्रा. प्रिती अग्रवाल व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. प्रा. अग्रवाल आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की, ‘मुलांना अभ्यासाचे ओझे घेऊन त्यांच्यावर दडपण आणू नका. मुलांपेक्षा पालकांच्या अपेक्षा वाढल्या असून असे न करता मुलांची बाजू समजून घेतली पाहिजे. त्यासाठी घरचे वातावरण चांगले असले पाहिजे. दररोज अभ्यास करण्याबरोबरच मुलांच्या आवडी-निवडी बद्दल कमेंट्स करू नका, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. पालकांनी सतत शिक्षकांच्या संपर्कांत राहणे गरजेचे आहे. मुलांनी व्यवस्थित अभ्यास करावा पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवले पाहिजे.’ तसेच मुले सोशल मिडियाचा कसा वापर करीत आहे याकडे पालकांचे लक्ष असायला हवे, यावेळी डॉ. अग्रवाल यांनी विद्यार्थी व पालकांच्या अनेक प्रश्नांचे निरसन केले तसेच लवकरच रायसोनी इस्टीट्यूट ऑटोनॉमस होईल अशी माहिती दिली. प्रास्ताविक प्रा. योगिता पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. प्रशांत देशमुख यांनी केले. यावेळी प्रा. मोनाली नेवे, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. राज कांकरिया, प्रा. आकाश पाटील, प्रा. भूषण राठी, प्रा. तन्मय भाले, प्रा. मकरंद वाठ, प्रा. कौस्तुभ सावंत उपस्थित होते,
रायसोनी मॅनेजमेट महाविध्यालयाचा नवा पॅटर्न – महाविध्यालयाच्या नव्या पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण पडू नये म्हणून दररोज तीन तास अभ्यास करून घेतला जाईल. त्याशिवाय तज्ञ मार्गदर्शन करून विध्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन वर्गात करून देतील, अशी माहिती प्रा. योगिता पाटील यांनी दिली.