पुजा मेन्सवेअरसह किड्स वेअरला शॉर्टसर्किटने आग
जळगाव – शहरातील फुले मार्केटमधील पूजा मेन्स वेअर या दुकानाला शॉर्टसर्किटने भिषण आग लागल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या भिषण आगीत दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे, फर्निचरसह रेडीमेड असे विविध प्रकारातील 26 लाख रुपये किमतीच्या नवीन कपड्यांची क्षणातच रांखरांगोळी झाली. वेळीच प्रकार लक्षात नसता, तर इतरही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून मोठी दुर्घटना घडली असती.
सिंधी कॉलनीत कंवरनगर येथील करण श्रावणकुमार तलरेजा (28) हे आई सुलोचन यांच्यासह वास्तव्यास आहेत. त्यांचे सेट्रल फुले मार्केटमध्ये तळ मजल्यावर क्रमांक 207 येथे पूजा मेन्सवेअर्स या नावाचे रेडिमेड कपडयाचे दुकान आहे. जीन्स पॅन्ट, टी. शर्ट, शर्ट, नाईट पॅन्ट, अन्डरवेअर्स बनियान ,शेरवानी अशी विविध ड्रेसची याठिकाणी ते विक्री करतात. तर त्यांच्याच दुकानाला असलेले दुकान क्रमांक 208 याठिकाणी त्यांचे बंधू संदिप राजकूमार तलरेजा व रॉबीन तलरेजा ( रा. आदर्शनगर) यांचे पूजा किटसवेअर्स नावाचे लहान मुलांचे रेडिमेड ड्रेस विक्रीचे दुकान आहे. माहितीनुसार दुकान मालक करण तलरेजा यांनी अग्नीशमन विभागाला माहिती देत, स्वतः घटनास्थळावर दाखल झाले. मनपाच्या अग्नीशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल होऊन कर्मचार्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाच्या पथकाला यश आले.
तापर्यंत दुकानातील रेडिमेड कपडे, फॅ न, फर्निचर, कॅमेरा जळून खाक झाला. वरच्या मजल्यावरील जीन्स पॅन्टसह शर्ट,शेरवानी, शर्ट, फर्निचर, फॅ न असे साहित्य संपूर्ण जळून खाक झाले. पूजा मेन्सवेअर्समध्ये कपडयांना आग लागल्यानंतर फर्निचर जळू लागल्याने आगीचा भडका झाला. शेजारी या दुकानाला लागून असलेले पूजा किटस वेअर्स यादुकानातही आग शिरली. लहान बालकांचे रेडिमेड ड्रेस तसेच फर्निचर, फॅ न असे साहित्य जळून खाक झाले आहेत. या दुकानात तीन ते पाच लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज लावला जात आहे.
10 लाख रुपये किंमतीचे जीन्स पॅण्ट, कॉटन, रेडिमेड कॉटन पॅन्ट, 9 लाख रूपये किंमतीचे रेडिमेड शर्ट, 5 लाख रूपये किंमतीचे टी.शर्ट, बनियान, अंडरवेअर्स, 35 हजार रूपये किंमतीचा ए.सी., 2 लाख रुपये किंमतीचे फर्निचर, सीसीटीव्ही व इतर साहित्य पूजा मेन्सवेअर्स या दुकानावर आकाश विरभण कटारिटा (सिंधी कॉलनी), दिनेश आहुजा (भुसावळ) तसेच उमाकांत प्रताप देवरे (कांचनगर) असे कर्मचारी कामाला आहेत. बुधवारी रात्री 09.15 वाजता नेहमीप्रमाणे करण यांच्यासह कर्मचारी दुकानाबाहेर आले. कर्मचार्यांनी शटर बंद करून दुकानाला कुलूप लावल्यानंतर सर्व जण घरोघर निघून गेले. रात्री या दुकानातून धूर निघत असल्याचे मार्केटमधील वॉचमन विठ्ठल पांडुरंग जाधव यांना दिसले. त्यानंतर त्यांनी तत्काळ दुकान मालक करण तलरेजा यांना मोबाईलवरून संपर्क साधून प्रकाराची माहिती दिली.
फुले मार्केट परिसर म्हटले म्हणजे गर्दीची गजबज असते. याठिकाणी पायी रस्ता काढणे अवघड होत असते. सुदैवाने आग दिवसा लागली नाही. अन्यथा अग्नीबंब मार्केटमध्ये आणणे म्हणजे कसरत झाली असती. दिवसा आगीत अन्य दुकानेही आगीत खाक झाले असते. रात्र व शुकशुकाट असल्याने मार्केटमध्ये अग्नीबंबला घटनास्थळापर्यंत वेळच पोहचू शकले. आगीच्या घटनेचा शहर पोलीस ठाण्यातील दुय्यम पोलीस निरीक्षक भिमराव नंदुरकर तसेच पोलीस नाईक योगेश सपकाळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. गुरुवारी अनेक व्यावसायीक यांनी याठिकाणी येऊन नुकसानाबददल तलरेजा यांच्याकडून माहिती जाणून घेतली.