नवी दिल्ली – NEET PG 2020 प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातील काऊन्सेलिंगला आज १२ मार्च २०२० पासून सुरुवात झाली आहे. हे समुपदेशन २२ मार्च २०२० पर्यंत सुरू राहणार आहे. शुल्क २२ मार्च २०२० रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत भरता येणार आहे. निकाल २५ मार्चला जाहीर केला जाणार आहे. काऊन्सेलिंग यादीत नाव येणाऱ्या उमेदवारांनी २६ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत रिपोर्ट करायचा आहे.
दुसऱ्या राऊंडची काउन्सेलिंग ७ ते १२ एप्रिल या कालावधीत होणार आहे. पसंतीक्रम भरण्यासाठी १२ एप्रिल दुपारी १२ वाजेपर्यंतचा वेळ आहे. परीक्षेचा निकाल १५ एप्रिल २०२० रोजी जाहीर होणार आहे. केंद्रीय विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे AFMS (आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिस) मध्ये नीट परीक्षेद्वारे प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. तसेच देशभरात जम्मू-काश्मीर वगळता सर्व राज्यांमध्ये मेडिकल, डेंटल महाविद्यालयांमध्ये ५० टक्के ऑल इंडिया कोट्यातले प्रवेश नीट परीक्षेद्वारे होतात.