जळगांव – आव्हाने शिवार येथील श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जळगांव जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघ ला भेट देऊन दुधापासून कोणकोणते पदार्थ बनविले जातात या बाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
तसेच नामवंत कंपनी पार्ले बिस्कीट या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बिस्कीट कसे बनवले जातात व बिस्कीट कसे तयार होतात व त्या प्रक्रिया बाबत सविस्तर जाणून घेतले.या बाबत विद्यार्थ्यांना चित्रफित दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांनी या प्रसंगाचा मनमुराद आनंद घेतला या उपक्रमाचे आयोजन मुख्यध्यापिका हर्षाली पाटील यांचा मार्गदर्शन खाली घेण्यात आला. राहुल पाटील,सद्दाम तडवी,जयश्री पाटील , मोहिनी सुरवाडे यांचे सहकार्य लाभले.